पाच नगरसेवकांचे राजीनामे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेविका रेखा टिंगरे, अश्विनी जाधव, प्रिया गदादे, सुनीता गलांडे आणि मिलिंद काची यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. टिंगरे, गलांडे हे भाजपमध्ये, तर जाधव आणि गदादे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात येणार आहेत. त्या वेळी अनेकांचे भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या टिंगरे, कॉंग्रेसच्या गलांडे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, कॉंग्रेसच्या अश्‍विनी जाधव, रईस सुंडके, मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बुधवारी प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे नगरसेवक मिलिंद काची यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस सोडून अन्य कुठल्याही पक्षात जाणार नसल्याचेही काची यांनी सांगितले. 

कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद धोक्‍यात? 
कॉंग्रेसच्या नगरसेविका अश्विनी जाधव, सुनीता गंलाडे, मिलिंद काची यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसपेक्षा मनसेच्या नगरसेवकांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे मनसेने या पदावर दावा केला, तर कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Five corporator resign