इंदापूरला पाणी योजनांच्या सर्वेक्षणासाठी पाच कोटींचा निधी 

राजकुमार थोरात
Wednesday, 23 September 2020

इंदापूर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत. या योजनांचे सर्वेक्षण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सर्वेक्षणाला लवकरच सुरवात होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. 

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत. या योजनांचे सर्वेक्षण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सर्वेक्षणाला लवकरच सुरवात होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापूरचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राज्यमंत्री भरणे यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील बैठक २६ ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये घेण्यात आली होती. या बैठकीला भरणे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. या वेळी इंदापूरचा पाणी प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी चर्चा झालेल्या सर्व योजनांच्या सर्वेक्षणासाठी ५ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. लवकरच सर्वेक्षणास सुरवात होणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली.

ग्राहक खायला येईनात, बारला परवानगी द्या; व्यावसायिकांची मागणी

त्यानुसार उजनी जलाशयातील पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे शेटफळगढे येथील खडकवासला कालव्यामध्ये सोडण्यासाठी उजनी पाणलोट क्षेत्रातील कुंभारगाव, डाळज, कालठण, शिरसोडी या ठिकाणी बुडीत बंधारे व बॅरेजेस उभारणेण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. तसेच, गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली लाकडी- निंबोडी उपसा सिंचन योजना सुरू करण्यात येणार आहे. शेटफळ हवेली तलावाची उंची वाढवून सांडव्याचे व  वितरीकेचे अपूर्ण काम करण्याचे नियोजन आहे. तसेच, विविध वळण योजना प्रस्तावित आहे. नीरा नदीवरील उद्धट व सोमथळीच्या धर्तीवर खोरोची येथे नीरा नदीवर बॅरेजेस बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे इंदापूरच्या पश्‍चिम भागातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटण्यास मोलाची मदत होणार आहे. या बॅरेजचे तत्काळ सर्वेक्षण करून अहवाल महामंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five crore fund for survey of water schemes to Indapur