पुणे- कॉटन कंपनीत आग; 5 ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

पुणे- पुण्यातील तळेगाव-चाकण रस्त्यावरील खराबवाडी येथे एका कॉटन कंपनीला लागलेल्या आगीत ५ जण ठार झाले आहेत. कॉटन कंपनीतील आगीनंतर अद्यापपर्यंत पाचजणांचे मृतदेह बाहेर काढले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाहेर काढण्यात आलेल्या मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

आग लागल्याचे कळविण्यात आल्यावर अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

Web Title: five dead in cotton godown fire near Chakan