शिवजन्मभूमितील पाच जवानांचे होतेय सर्वत्र कौतुक, कारण...

दत्ता म्हसकर
Friday, 22 January 2021

शिवजन्मभुमीतील पाच शिलेदार देश रक्षणासाठी भारतीय सैन्यात दाखल झाले आहे. या पाच जवानांचे सर्वत्र कौतुक होत असून गावोगावी मिरवणुका काढून त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत. 

जुन्नर: शिवजन्मभुमीतील पाच शिलेदार देश रक्षणासाठी भारतीय सैन्यात दाखल झाले आहे. या पाच जवानांचे सर्वत्र कौतुक होत असून गावोगावी मिरवणुका काढून त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत. 

हेही वाचा- राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही

निकेतन कोंडे (धामणखेल), सुरज डोके (कुमशेत), प्रथमेश महाकाळ (मांदारणे), आदित्य डोंगरे(बल्लाळवाडी), निखिल कबाडी (कबाडवाडी) या पाच जवानांच्या सन्मानार्थ धामनखेल, कबाडीवाडी तसेच येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. युवकांनी त्यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली.ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या.

एकाच वेळी पाच जणांची निवड होण्याची ही जुन्नरमधील पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. जुन्नर येथे ओंकार मेहेर मित्र परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा भारती मेहेर, तुळशीराम शिरसाठ, बळीराम थोरात, रवींद्र काजळे अक्षदा गाडेकर, गणेश शेटे व मान्यवर उपस्थित होते.

म्हाडाच्या ५६४७ सदनिकांची आज Online सोडत; कोणाचं गृहस्वप्न होणार साकार?

धामणखेल येथे या पाच जवानांच्या सन्मानार्थ त्यांचे मार्गदर्शक शिक्षक कॅ. डॉ. बाबासाहेब माने, माजी सैनिक रमेश खरमाळे, पाटील, तसेच गावातील सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते. कबाडवाडी येथे पोलीस निरीक्षक विकास जाधव व ग्रामस्थांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five men from junnar enlisted in the indian army