esakal | बारामतीत चिंतेचे वातावरण, कोरोनाचा आणखी एवढे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण कायमच आहे. आजही पाच जण पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे आता बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 78 वर जाऊन पोहोचली आहे

बारामतीत चिंतेचे वातावरण, कोरोनाचा आणखी एवढे रुग्ण

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण कायमच आहे. आजही पाच जण पॉझिटीव्ह आढळले. त्यामुळे आता बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या 78 वर जाऊन पोहोचली आहे. 

 इंधन दरवाढीचा वेग सुसाट, डिझेलची दरवाढ सुरूच

बारामती तालुक्यातील 17 जणांचे काल स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील बारामती शहरातील दोघे, तर ग्रामीण भागातील तीन, असे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बारामतीतील आमराई परिसरातील 59 वर्षांची एक महिला, तर तिचा पंचवीस वर्षांचा मुलगा पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील मेखळी येथील साठ वर्षांचा पुरुष व कांबळेश्वरमधील 29 वर्षाचा तरुण, तर वाणेवाडीतील 34 वर्षीय महिलाही पॉझिटिव्ह आढळली आहे. बारामती शहरासह तालुक्यातही आता नियमित रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याची चर्चा आहे. बारामती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरु असले, तरी रुग्णांची संख्या विचारात घेता प्रशासनापुढील आव्हाने अधिकच गडद होत आहेत.