अवघडच आहे, दौंडमध्ये कोरोनाबाधिताच्या मुलाकडून चहाची विक्री... 

corona
corona

दौंड (पुणे) : दौंड तालुक्‍यातील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाने 17 दिवसांच्या उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. परंतु, शहरातील चार पोलिस आणि एक वयस्कर दूध विक्रेते, अशा एकूण पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या 23 झाली आहे, अशी माहिती दौंड उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. 
मात्र, कोरोनाबाधित दूध विक्रेत्याच्या मुलाने लॉकडाउनच्या काळात महात्मा गांधी चौकातील बोळात हातगाड्यावर चहा विक्री केल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. 

दौंड तालुक्‍यातील दहिटणे येथे 29 एप्रिल रोजी 70 वर्षीय नागरिकास कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या संपर्कातील नागरिक, बाधा होण्यापूर्वी त्यांच्या उपचार करणारे खासगी रुग्णालयाचे डॉक्‍टर व कर्मचारी, अशा एकूण 23 जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. सुदैवाने ते सर्व निगेटिव्ह आले होते. या बाधित नागरिकास मागील आठवड्यात अतिदक्षता विभागातून बाहेर आणून प्राणवायू दिला जात होता. आज त्यांचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना श्‍वसनाचा थोडा त्रास होत असल्याने उद्या रुग्णालयातून सोडले जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. 

दरम्यान, इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) मुख्यालय कोल्हापूर येथे असून, गट क्रमांक सोळा या नावाने ते ओळखले जाते. "आयआरबी'च्या काही तुकड्या दौंड शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रांगणात स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. मुंबई येथे बंदोबस्त करून परतलेल्या "आयआरबी'च्या एका तुकडीचे दौंड- पाटस रस्त्यावरील विद्यालयात संस्थात्मक विलगीकरण केलेले आहे. या तुकडीतील 3 पोलिसांना बाधा झाली आहे. शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातमधील एक पोलिस आणि दौंड- सिद्धटेक रस्त्यालगत गवळीवाडा येथे दूध विक्री करणारे 82 वर्षीय नागरिक, अशा एकूण पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाल्याची माहिती डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

रोनाबाधित व्यक्तींपैकी दूध विक्रेत्यास पुणे येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे; तर चार पोलिसांना रवाना केले जाणार आहे. कोरोनाबाधित दूध विक्रेत्याची दोन मुले आणि नातू, असे एकूण चार जण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. त्यापैकी एका मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे; तर अन्य प्रलंबित आहेत. परंतु, एका मुलाने लॉकडाउनच्या काळात महात्मा गांधी चौकातील बोळात हातगाड्यावर चहा विक्री केल्याने प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. गवळीवाडा आणि महात्मा गांधी चौकाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, बाधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com