भोरमधील या एकाच गावात आढळले कोरोनाचे पाच रुग्ण

विजय जाधव
सोमवार, 29 जून 2020

नाझरे येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील २८ जणांने स्वॅब शनिवारी तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्याचा अहवाल सोमवारी (ता. २९) सकाळी आला. त्यामध्ये

भोर (पुणे) : कोरोनामुक्त झालेल्या भोर तालुक्यातील नाझरे गावात शनिवारी (ता. २७) आढळलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत क-हाळे यांनी दिली.  

खेकडे, मासे पकडणाऱ्यांच्या हाती आले टॅब

नाझरे येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील २८ जणांने स्वॅब शनिवारी तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्याचा अहवाल सोमवारी (ता. २९) सकाळी आला. त्यामध्ये दोन महिलांसह पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाने शनिवारपासून नाझरे व आंबवडे गावात कंटेन्मेंट झोन जाहीर केला असून, गावातील रस्ते बंद केले आहेत. 

शिरूर- हवेलीतील कुटुंबांना माहेरचा आधार

तसेच, रविवारी (ता. २८) पुणे- सातारा महामार्गावरील शिवरे येथील कंपनीमधील दोन कामगार कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. परंतु, एक कामगार हा पुण्यातील हडपसर परिसरातील, तर दुसरा सातारा येथील आहे. त्य़ामुळे नाझरे वगळता भोर तालुक्यात एकाही गावात कोरोनाचे रुग्ण नसल्याचेही डॉ. सूर्यकांत क-हाळे यांनी सांगितले. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण

भोर शहरात सापडलेले दोघांनीही कोरोनावर मात केली असून, ते पूर्णपणे बरे झाले आहेत. परंतु, आता नाझरे येथील ६ जण कोरोनाग्रस्त आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचे २५ रुग्ण आढळलेले होते. त्यापैकी १९ जण बरे होऊन घरी गेलेले आहेत. सध्या ६ जण उपचार घेत आहेत. सुदैवाने कोरोनामुळे तालुक्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाचे मुंबई व पुणे कनेक्शन
भोर तालुक्यात १४ एप्रिलला नेरे गावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तो मुंबईहून गावाला आला होता. त्यानंतर मुंबई कनेक्शनचे नेरे, रायरी, मानकरवाडी, धारांबेवाडी, वरोडी खुर्द, नसरापूर, जांभळी, वेळू आदी गावांसह भोर शहरातही कोरोनाचे रुग्ण आढळले. लॉक़डाउनच्या कालावधीत पुण्या-मुंबईहून सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त नागरिक भोर तालुक्यात आलेले आहेत. त्यापैकी काही जण जून महिन्यात पुन्हा पुण्यात येजा करीत होते. त्यामुळे जूनच्या दुस-या आठवड्यात पुणे कनेक्शनुमुळे भोर शहर व नाझरे येथील नागरिकांना कोरोनाची लागण झाली. 

संयमी नागरिक, तत्पर प्रशासन
जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा भोर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आहेत. कारण भोरचे प्रांताधिकारी व 
आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजित पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत क-हाळे, भोरचे पोलिस निरीक्षक राजू मोरे, राजगडचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय दराडे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात आणि गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी उत्तम व्यवस्थापन व बंदोबस्त केला. त्यांना नागरिकांनी आणि स्थानीक लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five patients of Corona were found in Bhor taluka