क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या पाच जणांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या पाच जणांना खालापूर येथील हॉटेलवर छापा घालून अटक केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. 98 हजार रुपयांच्या रोख रकमेसह 12 लाख 26 हजार 160 रुपयांचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. 

पुणे - आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या पाच जणांना खालापूर येथील हॉटेलवर छापा घालून अटक केली. पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. 98 हजार रुपयांच्या रोख रकमेसह 12 लाख 26 हजार 160 रुपयांचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. 

नवीन बाळकृष्ण अगरवाल (वय 41, रा. मेन बझार, देहूरोड), दीपक दौलतराम कृपलानी (वय 43, जाधववाडी, चिखली), नदीम मैमुद्दीन पठाण (वय 28, रा. आकुर्डी), विक्रम वारसमल जैन (वय 39, रा. निगडी गावठाण), नरेश रामस्वरूप अगरवाल (वय 47, रा. सोमाटणे फाटा) अशी अटक करण्यात आलेल्या पाच संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह हॉटेलचा व्यवस्थापक रवींद्र राजाराम डोंगरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार कायदा, इंडियन टेलिग्राफ अधिनियम (क) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

तळेगाव परिसरात काही जण आयपीएल मॅचवर सट्टा खेळणार असून सर्व जण पांढऱ्या कारमधून येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पथकाची रचना करून सापळा रचला. सोमाटणे फाटा येथे स्कोडा गाडीतून पाच जण देहूरोडच्या दिशेने जाताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी संशयास्पद कारचा पाठलाग सुरू केला. या कारने खोपोली मार्गे खालापूर पनवेल रस्ता गाठला. 

अखेर ग्रामीण पोलिसांनी रायगड पोलिसांची मदत घेऊन या कारचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही कार पनवेल रस्त्यावरील "लीला इन' या हॉटेलसमोर थांबल्याचे आढळले. या कारमधील पाचही जण संबंधित हॉटेलमध्ये आयपीएल मॅचवर सट्टा खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर पोलिसांनी छापा घालून त्यांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 11 मोबाईल, 1 लॅपटॉप, टीव्ही, सेट टॉप बॉक्‍ससह 98 हजार रुपयांची रोकड, स्कोडा कार असा 12 लाख 26 हजार 160 रुपयांचा ऐवज जप्त केला.

Web Title: Five people arrested for betting on Cricket Match