पुण्यात ढगफुटीने सात जणांचा मृत्यू; मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 September 2019

पद्मावतीजवळील अरणेश्वर येथील टांगेवाले कॉलनीत ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने भिंत कोसळली. या दुर्घटनेत रोहित भरत आमले (वय 13), संतोष कदम (वय 55), सौंदलीकर (वय 32) आणि त्यांचा 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, शिंदे हायस्कुलनजीक नाल्यात 1 महिलेचा मृत्यू झाला आहे.

पुणे : पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पद्मावतीजवळील अरण्येश्वर येथे भिंत कोसळून पाच जणांचा मृत्य झाला असून, तर, अन्य ठिकाणी दोन असे एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना सुटी 

सप्टेंबरअखेरपर्यंत तरी पाऊस पुणेकरांची पाठ सोडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. शहरात गेले दोन दिवस धुवाधार पाऊस पडत आहे. शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस पावसाची 51 ते 75 टक्के शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. पुण्यात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या पावसाने अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. तर, रस्ते जलमय झाले होते.

पुण्यात ढगफुटी; 87.3 मिमी पावसाची नोंद; आठ वर्षांतील उच्चांक 

पद्मावतीजवळील अरणेश्वर येथील टांगेवाले कॉलनीत ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने भिंत कोसळली. या दुर्घटनेत रोहित भरत आमले (वय 13), संतोष कदम (वय 55), सौंदलीकर (वय 32) आणि त्यांचा 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, शिंदे हायस्कुलनजीक नाल्यात 1 महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, सिंहगड रोड रस्त्यावर एकाचा मृत्यू सापडला आहे. अग्निशमन दलाकडून रात्रभरातील पाऊसाच्या बचाव कार्यात एकूण 574 नागरिकांची सुटका केली आहे. पुणे शहरातील पावसात रात्री चारचाकी वाहुन गेल्याने दगावलेल्यांची संख्या वाढणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five people dead due to heavy rainfall in Pune