बारामतीत अजित पवारांविरोधात भाजपकडून लढण्यासाठी 'हे' पाच जण इच्छूक

बारामतीत अजित पवारांविरोधात भाजपकडून लढण्यासाठी 'हे' पाच जण इच्छूक

बारामती शहर ः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढविण्यासाठी आज पाच जणांनी पक्षाकडे अधिकृतपणे इच्छा व्यक्त केली. 

आज सासवड येथे झालेल्या मुलाखतीदरम्यान कुलभूषण कोकरे, गोविंद देवकाते, अभिजित देवकाते, सुरेंद्र जेवरे, राहुल तावरे यांनी उमेदवारी मागितली आहे. पक्षाचे निरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी इच्छुकांशी चर्चा केली. प्रबळ इच्छुक असलेल्या बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, प्रशांत नाना सातव व अविनाश मोटे हे मात्र या मुलाखतीच्या प्रक्रियेपासून दूर राहिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजपच्या रणनीतीचा हा भाग असावा की काय, अशी शक्‍यता यात वर्तविली गेली. तसेच, माळेगाव कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. तसेच, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी सावध भूमिका घेतली आहे.

आज सासवड येथे झालेल्या मुलाखतींसाठी कोण उघडपणे उमेदवारी मागणार, या बाबत बारामतीत उत्सुकता होती. राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासमोर प्रमुख दावेदारांनी उमेदवारीसाठी इच्छा प्रदर्शित न केल्याने भाजपच्या मनात नेमके काय आहे, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

बारामतीत गेल्या पंचवीस वर्षांत अजित पवार यांना पराभूत करणे कोणालाच शक्‍य झालेले नाही. बारामती मतदारसंघावरील त्यांची पकड विचारात घेता त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रीय समाज पक्षाकडूनही उमेदवार दिला जाणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ही लढत सरळ होणार की तिरंगी होईल, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com