जुन्नरमध्ये एका दिवसात 'एवढ्या' रुग्णांची भर 

दत्ता म्हसकर
रविवार, 28 जून 2020

ओतूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच वारुळवाडी, विठ्ठलवाडी-येणेरे व संतवाडी-आळे व जुन्नर येथे कोरोनाबाधित एकूण पाच रुग्ण आढळून आल्याने तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या 58 झाली.

जुन्नर (पुणे) : ओतूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तसेच वारुळवाडी, विठ्ठलवाडी-येणेरे व संतवाडी-आळे व जुन्नर येथे कोरोनाबाधित एकूण पाच रुग्ण आढळून आल्याने तालुक्‍यातील एकूण रुग्णसंख्या 58 झाली. यापैकी 32 जण बरे झाले आहेत, तर 24 जण उपचार घेत आहेत. औरंगपूर व मोकासबाग येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

जिजा आणि दाजी; वाचा शरद पवार यांच्या लग्नाची गोष्ट!

लेण्याद्री येथील कोविड केंद्रात 17, तर पुणे येथे 7 जण उपचार घेत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्‍यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता देखील वाढत चालली आहे. जुन्नर शहरात दुसरा रुग्ण आढळून आला आहे. उंब्रज, ओतूर, आळे व सावरगाव येथील रुग्णांच्या संपर्कातील एकूण 32 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. 
 

पुण्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतीच, आता तुम्हीच तुमचे रक्षक व्हा!

गावनिहाय बरे व मृत्यू झालेले व अॅक्टिव्ह रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे:- डिंगोरे - १  (बरा), सावरगांव -  ५ (बरे), मांजरवाडी -  २ (बरे),पारुंडे - ३  (बरे), आंबेगव्हाण - २ (बरे),धोलवड - ३ (बरे ), धालेवाडी तर्फे मिन्हेर - १ (बरा), विठ्ठलवाडी -वडज - १ (बरा),शिरोली तर्फे आळे २ (बरे), खिलारवाडी - १(बरा) ,कुरण - १(बरा), चिंचोली - ३(बरे),ओतुर - २ (बरा) जुन्नर- १(बरा), राजुरी- १(बरा), नवलेवाडी - १(बरा) ,धामणखेल -१(बरा),कुसुर- १.

मृत्यू:- औंरगपूर - १(मृत्यू),  मोकासबाग-१ (मृत्यू),  अॅक्टिव्ह :-   बोरी- ३,खामुंडी-७, खानापूर-३, शिरोली खुर्द-३,उंब्रज नंबर एक-१. धनगरवाडी - १, ओतूर-१, वारूळवाडी-१, विठ्ठलवाडी-१, संतवाडी,-१,वारुळवाडी-१,जुन्नर-१. एकुण रुग्ण ५८, मृत्यू - २, बरे ३२, ऍक्टिव्ह - २४. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: five person affected by corona in junnar