esakal | आमदार बेनके यांच्या सुरक्षारक्षकाला मारहाणप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

crime
आमदार बेनकेंच्या सुरक्षारक्षकाला मारहाणप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना शिवीगाळ करून त्यांच्या निवासाचा सुरक्षारक्षक खंडेराव पिराजी पानसरे( वय ३५ , राहणार नारायणगाव) यांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर आज दुपारी गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या प्रकरणी कपिल कानसकर ( राहणार नारायणगाव, पाटेआळी) व अन्य चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: जुन्नर तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडरची तीव्र टंचाई

दरम्यान, या बाबत ताटे म्हणाले खंडेराव पानसरे हे मागील पाच वर्षा पासून आमदार बेनके यांच्या निवासस्थानी सुरक्षारक्षक म्हणून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत काम पहातात. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कपिल कानसकर व अन्य चार जण दुचाकीवरून आमदार बेनके यांच्या निवासस्थानी आले. कुठे आहे तुझा आमदार असे म्हणून त्यांनी आमदार बेनके यांना शिवीगाळ केली. या वेळी सुरक्षारक्षक पानसरे यांनी त्यांना निवासस्थानात जाण्यास प्रतिबंध केला. या मुळे संतापलेल्या कानसकर व त्यांच्या सोबत असलेल्या अन्य व्यक्तींनी पानसरे यांना बेदम मारहाण केली व त्यांच्या खिशातील दोनशे रुपये काढून घेतले. या वेळी पानसरे यांनी आरडाओरडा केल्याने कानसकर व अन्य व्यक्ती निघून गेल्या. त्या नंतर आज सकाळी पानसरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कानसकर व अनोळखी चार व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. दरम्यान ही घटना घडली तेंव्हा रात्री आमदार बेनके हे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मतदारसंघात फिरत होते. ते निवासस्थानी नव्हते.

हेही वाचा: प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश