''भाजी विकू नको सांगितले'' म्हणून भाजीवाल्याचा आठ पैलवानांसह सोसायटीत राडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

पुणे : सोसायटीत भाजी विकण्यास मनाई केल्यावरून भाजी विक्रेत्यासह सात-आठ पैलवानांनी सोसायटीतील तिघांना बेदम मारहाण केली. तसेच तोडफोडही केली. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथील लिपणे वस्तीतील अमृतसिटीमध्ये रविवारी रात्री घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

अजित पवारांनी करून दाखवलं अन् माळेगावचं मैदान मारलं

सुभाष शिंदे (वय 64, रा. अमृतसिटी सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पैलवान सचिन मोहोळ याच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादी सोसायटीत रविवारी सकाळी लाल टेम्पोतून भाजी विक्री करत होते. त्या वेळी त्यांना परवानगी न घेता भाजी विक्री का करता, असा जाब विचारला. भाजी विक्री करू नको, असे सांगून सोसायटीतून बाहेर जाण्यास सांगितले. त्याचा टेम्पोचालकास राग आला. त्याने रात्री दहा वाजता पैलवान सचिन मोहोळ व त्याच्या साथीदार पैलवानांना सोसायटीत आणले.

पुरंदर विमानतळ ठरणार फायदेशीर; दर वर्षी येतील 'इतके' प्रवासी!

लाठ्या-काठ्या व कोयता घेऊन आलेल्या पैलवानांनी सोसायटीमध्ये शिरून गोंधळ घालून तोडफोड केली. तसेच तेथील श्रीनाथ डेअरीमध्ये घुसून सौरभ शेवाळे व प्रणव शेवाळे यांच्यावर कोयत्याने वार केले. याबरोबरच समर्थ सोसायटीतील महादू मारणे यांनाही काठीने मारहाण केली. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. नंतर आरोपी तेथून पळून गेले. 
पुणेकरांना आता जंगलाचा राजा बघायला मिळणार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vegetable seller and eight wrestlers vandalised in society at ambegaon budruk

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: