esakal | बेपत्ता व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरूच; पोलिसांची पाच पथके तैनात
sakal

बोलून बातमी शोधा

Gautam_Pashankar

पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजल्यापासून जंगली महाराज रस्ता येथून बेपत्ता झाले आहेत. तेव्हापासून पोलिसांची पाच पथके त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही ते सापडले नाहीत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

बेपत्ता व्यावसायिक गौतम पाषाणकर यांचा शोध सुरूच; पोलिसांची पाच पथके तैनात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीनगर येथून बेपत्ता झालेले पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि बांधकाम व्यावसायिक गौतम विश्‍वानंद पाषाणकर (वय 65) यांचा शोध घेण्यावर शिवाजीनगर पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. हॉटेल्स, रेल्वे स्थानकांसह सर्व ठिकाणी शोध घेतला जात असल्याची माहिती परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांनी दिली. 

लग्नाचे फोटो न देणे फोटोग्राफरच्या अंगाशी; दंड म्हणून द्यावे लागणार दोन लाख रुपये!​

पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी पावणे पाच वाजल्यापासून जंगली महाराज रस्ता येथून बेपत्ता झाले आहेत. तेव्हापासून पोलिसांची पाच पथके त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, अजूनही ते सापडले नाहीत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. पाषाणकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत गेल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून दिसत आहे. याविषयी डॉ. नारनवरे म्हणाल्या, "शिवाजीनगर पोलिसांची चार ते पाच पथके पाषाणकर यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी जवळपासच्या पोलिस ठाण्यांकडूनही सहकार्य केले जात आहेत. पाषाणकर हे सुखरूप घरी परततील, असा त्यांच्या कुटुंबीयांना विश्‍वास आहे. त्यादृष्टीने आमचाही रात्रंदिवस तपास सुरू आहे.'' 

दरम्यान, ऍड. उमेश मोरे यांच्या खुनाच्या प्रकरणानंतरही शिवाजीनगर पोलिसांकडून पाषाणकर यांच्या तपासाबाबत मात्र प्रसारमाध्यमांना माहिती दिली जात नसल्याची सद्यःस्थिती आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image