पुणे : कोरोना विषाणू धसका; पाच हजार प्रवाशांची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

कोरोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून राज्यात येणा-या पाच हजार 128 प्रवाशांचे गुरुवारपर्यंत मुंबई विमानतळावर स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यातील बाधित भागातून आलेले महाराष्ट्रातील 36 प्रवासी आढळले आहेत. त्यापैकी 12 प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.

पुणे : कोरोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या भागातून राज्यात येणा-या पाच हजार 128 प्रवाशांचे गुरुवारपर्यंत मुंबई विमानतळावर स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यातील बाधित भागातून आलेले महाराष्ट्रातील 36 प्रवासी आढळले आहेत. त्यापैकी 12 प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

मुंबई व पुण्यात प्रत्येकी पाच, तर नांदेड व नागपूर येथे प्रत्येकी एक प्रवासी विलगीकरण कक्षात आहे. मुंबईत दाखल असलेल्या तिघांना गुरुवारी घरी सोडण्यात आले होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला (एनआयव्ही) येथे भेट देऊन कोरोना विषयक प्रतिबंध व नियंत्रण उपाय योजनांची माहिती घेतली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी कोरोना संदर्भात विभाग करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. भरती प्रवाशांपैकी नऊ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह असल्याबाबतचे अहवाल एनआयव्हीने दिला आहे. तर उर्वरित तीन रुग्णांचे अहवाल शनिवारपर्यंत मिळणार असल्याचे एनआयव्हीने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand passengers checked Corona virus test in Pune