esakal | मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Five Two Wheeler seized from thieves

चिंचवड-टेल्को रस्त्यावर बुधवारी (ता. 4) एक अल्पवयीन मुलगा नंबर नसलेली चोरीची दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी दहा दिवसांपूर्वी मोहननगर येथून चोरल्याचे त्याने सांगितले.

मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला अटक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 

चिंचवड-टेल्को रस्त्यावर बुधवारी (ता. 4) एक अल्पवयीन मुलगा नंबर नसलेली चोरीची दुचाकी घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी दहा दिवसांपूर्वी मोहननगर येथून चोरल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्यात ताब्यात घेऊन पुढील चौकशीत पिंपरी पोलिस ठाण्यातील एक, वाकड ठाण्यातील दोन, देहूरोड ठाण्यातील एक तर हडपसर ठाण्यातील एक असे दुचाकी चोरीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले. चोरट्याकडून दोन लाख 45 हजार रुपये किमतीच्या पाचही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही पेशंट नाही, पण...

loading image