esakal | पुणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही पेशंट नाही, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

- हात वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवावेत. 
- सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांशी संपर्क साधा.
- हस्तांदोलन करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. 
- सर्दी, ताप असणाऱ्यांपासून किमान एक मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवावे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही पेशंट नाही, पण...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जगभरात कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात किंवा पुणे जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तथापि, नागरिकांनी वैयक्तिक आरोग्य स्वच्छतेबाबत खबरदारी घ्यावी. तसेच, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी धुलिवंदन शक्‍यतो टाळावे. तसेच मेळावा, यात्रा अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले. 

कोरोना विषाणू बाधित 12 देशांमधून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. परदेशांमधून आलेल्या कोरोनाच्या 332 संशयित प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 182 जणांची तपासणी पूर्ण झाली असून, त्यांना आणखी 14 दिवस घरीच राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे. अन्य दीडशे संशयित प्रवासी आरोग्य विभागाच्या निरीक्षणाखाली आहेत. तसेच, आजअखेर 94 संशयित रुग्णांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 91 जणांचे नमूने तपासणीत निगेटिव्ह आढळले असून, उर्वरित तीन संशयित रुग्णांच्या नमुन्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे, असे त्यांनी सांगितले. 

- शृंगारपुरात होणार येसुबाईंचे स्मारक

यात्रा-मेळाव्यावर बंदीबाबत लवकरच निर्णय - जिल्हाधिकारी 
आपल्या कुटुंब किंवा मित्रपरिवाराकडून आयोजित धुलिवंदन कार्यक्रमात सहभागी व्हायला हरकत नाही, तथापि, पंचतारांकित हॉटेल्स आणि अनोळखी लोकांनी आयोजित केलेल्या धुलिवंदन कार्यक्रमात सहभागी होवू नये. यात्रा-मेळाव्यावर बंदीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. कोरोना रुग्ण निदान केवळ राष्ट्रीय विषाणू विज्ञान (एनआयव्ही) संस्थेतच होते. त्यामुळे सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. वातावरणातील बदलामुळे सर्दी-पडसे होवू शकते. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता वैद्यकीय उपचार करुन घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. 

- Coronavirus : 'आयफा'नंतर देशाची प्रतिष्ठा जपणारे 'हे' कार्यक्रमही रद्द!

हॉटेलमधील परदेशी नागरिकांवर लक्ष 

एखाद्या हॉटेलमध्ये परदेशी नागरिक आजारी असल्यास तेथील व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी. अन्यथा संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. 

कोरोनाशी लढण्यास प्रशासनाची तयारी : 

- नायडू रुग्णालय, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात उपचार व्यवस्था 
- संभाव्य उद्रेक लक्षात घेता शंभर बेड क्षमतेची तयारी 
- डॉक्‍टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, आयांना प्रशिक्षण 
- एन 95 मास्क केवळ डॉक्‍टर्स, नर्स आणि रुग्णांसाठी आवश्‍यक 
- दहा खासगी रुग्णालयांकडून बेड उपलब्ध करून देण्याची तयारी 
- कोल्हापूर जिल्ह्यात सहा आणि सांगली येथे सात संशयित निरीक्षणाखाली 
- बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याबाबत अद्याप सरकारच्या सूचना नाहीत 
- शिजवलेल्या शाकाहारी, मांसाहारी अन्नातून संसर्ग नाही 
- बसस्थानक आणि रेल्वेस्थानकावर विशेष अभियान 
- नागरिकांनी अनावश्‍यक प्रवास टाळण्याचे आवाहन 

कोरोना नियंत्रण कक्ष :

टोल फ्री क्रमांक 104 
020- 26127394, 020- 25506330 

- Coronavirus : कोरोनाबाबत पुणे विद्यापीठ सतर्क; दिल्या अशा सूचना...

कोरोना टाळण्यासाठी अशी घ्या खबरदारी : 

- श्‍वसन आणि हात धुण्याबाबतचे शिष्टाचार पाळावेत.
- सर्दी, खोकला असल्यास रुमाल किंवा मास्क वापरावा. 
- हात वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवावेत. 
- सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळल्यास डॉक्‍टरांशी संपर्क साधा.
- हस्तांदोलन करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. 
- सर्दी, ताप असणाऱ्यांपासून किमान एक मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवावे.
- वारंवार चेहऱ्याला हात लावू नये. 
- खिडकी, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, स्नानगृह कोरडे ठेवावेत.