5,814 students get admission opportunities in the second round of 5-year law admissions.
sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी निवड यादी जाहीर झाली आहे. यात राज्यातील विविध विधी महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या फेरीसाठी आठ हजार ७७३ प्रवेशाच्या जागा उपलब्ध होत्या. या फेरीत एकूण पाच हजार ८१४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.