Valentine Special : Pomise Day ला केले propose अन् चिमुकलीला पुन्हा मिळाले आई-वडील

five year old girls parents disputes solved in family court On promise day
five year old girls parents disputes solved in family court On promise day

पुणे : आर्थिक स्वायत्तता आणि माघार न घेण्याची वृत्ती यामुळे संसाराचा कडेलोट होणार आणि त्यात पाच वर्षीची मुलगी देखील भरडली जाणार अशी स्थिती सातव दांम्पत्यात निर्माण झाली होती. मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचा असणारा 'Valentine's Week' आणि समुपदेशकांचे मार्गदर्शन यामुळे "ते' पुन्हा एकत्र आले. 

पुणे पोलिस पडले प्रेमात, पाहा कोण आहे Valentine?

''यापुढे आपल्याला एकत्र राहणे शक्‍यच नाही'', अशी भूमिका घेतलेल्या दोघांनी भविष्याचा आणि आपल्या मुलीचा विचार करून पुन्हा एकमेकांना प्रेमाची हाक दिली आणि 'Pomise Day' पासून पुन्हा त्यांचा प्रेमाचा संसार सुरू झाला. विवाहनंतरचे वाद संपवून पुन्हा निर्माण झालेल्या या प्रेमामुळे त्यांच्या मुलीला उज्ज्वल भविष्य लाभणार असून दोन कुटुंब विभक्त होण्यापासून वाचली. त्यामुळे या वर्षाचा 'Valentine's Week' राकेश आणि रेश्‍मा यांच्या वैवाहिक जीवनाला कलाटणी देणारा ठरला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विविध कारणांमुळे पटत नसल्याने दोघेही गेल्या तीन वर्षांपासून वेगळे राहत होते. 36 वर्षीय राकेश व 32 वर्षांच्या रेश्‍मा यांना आर्वी ही पाच वर्षांची मुलगी आहे. नियमित चॅटिंग करायची, एकमेकांना वेळ न देणे, अत्यल्प संवाद, सांभाळून घेण्याची प्रवृत्ती नव्हती त्यामुळे दोघांत नेहमी वाद होत. रेश्‍मा बॅंकेत तर राकेश आयटीमध्ये नोकरीला आहे. दोघांनाही पुरेसा पैसा मिळत. त्यामुळे आर्थिक स्वायत्तता. तर दोघांच्या इगोचा प्रॉब्लेम होताच. त्यातून त्यांनी घटस्फोटाचा दावा दाखल केला. 

‘व्हॅलेंटाइन डे’मुळे गुलाब बहरला
वाद कौटुंबिक न्यायालयात दाखल झाल्यानंतर समुपदेशकांनी त्यांना एकत्र येण्याचे फायदे आणि घटस्फोटाचे तोटे समजावून सांगितले. तुम्ही विभक्त झाल्यास मुलीच्या भविष्याचे काय यावर त्यांना विचार करायला लावला. रेश्‍माचे म्हणणे होते की, ''आत्मसन्मान झुकू देणार नाही. मात्र, विभक्त झाल्यानंतर तुम्हाला पूर्वीसारखा मान राहणार नाही. तुम्ही आयुष्याच्या मध्यात पोचत आहात. या वयात मागे फिरण सोपे नाही, त्यामुळे मुलीचा विचार करत पुन्हा नव्या दमाने आयुष्याची सुरवात करा'',असे त्यांचे समुपदेशन करण्यात आल्याची माहिती अॅड. झाकिर मणियार यांनी दिली. 
 
Pomise Day ला केले propose अन्, आयुष्याची पुन्हा नवी सुरवात

राकेश आणि रेश्‍मा यांचा दावा समुपदेशनासाठी न्यायालयात आला त्या दिवशी 'Pomise Day' होता. आयुष्यभरासाठी एखाद्या तरुण-तरुणीला बरोबर येण्यासाठी व ही बाब एकमेकांना सांगण्यासाठी हा दिवस खास असतो. त्याचा संदर्भ देत दोघांना समजावले. त्यामुळे पुन्हा सात जन्माची साथ देण्याची इच्छा दाखवत राकेशने एका अर्थाने रेश्‍माला प्रपोझ केले व तिने देखील त्याला होकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com