esakal | रस्त्यावर ध्वज बनवणाऱ्यांचे आयुष्यचं झालंय 'लॉकडाऊन'
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यावर ध्वज बनवणाऱ्यांचे आयुष्यचं झालंय 'लॉकडाऊन'

रस्त्यावर ध्वज बनवणाऱ्यांचे आयुष्यचं झालंय 'लॉकडाऊन'

sakal_logo
By
- मोहिनी मोहिते --------

कॅन्टोन्मेंट : ''कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी" बालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. मात्र, शहर-उपनगरातील पदपथ आणि उड्डाण पुलाखाली जगणारा अकुशल पण कुशलतेने कागदी आणि प्लास्टिकचे तिरंगा ध्वज आणि इतरही काही वस्तू तयार करून जगणारा वर्ग आहे. त्यांच्याकडे पाहून मनाची कालवाकालव झाल्याशिवाय राहत नाही. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे सावट पसरल्यामुळे खरंच त्यांच्यावर उपासमारच आली आहे.

''आम्हालाही सन्मानाने जगायचे आहे. आम्हाला भीक नको आहे, आमच्या कामाचे दाम मिळाले पाहिजे, अशीच भावना या मंडळींची आहे. मात्र, त्यांच्या नशिबी अजून ते आले नाही, असेच दिसत आहे. राहायला घरच नाही, तर शिक्षण कोठून येणार आणि शिक्षण नाही, तर रोजगार कोण देणार'' अशी विचित्र अवस्था त्यांची आहे.

हेही वाचा: खडी, क्रशसॅण्ड, डबरच्या दर २५ ते ३० टक्क्यांनी वाढले

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी व एक मे या राष्ट्रीय सणानिमित्त तिरंगी ध्वज बनवून विकायचे, त्यानंतर पुन्हा लिंबू-मिरची तारेमध्ये गुंफून वाहनचालक, दुकानदारांना विकायची असा या वर्गाचा जीवन प्रवास सुरू आहे. चौकामध्ये वाहने थांबली की, त्यांच्याकडे लहानग्यांना तिरंगा, लिंबू-मिरर्ची घेऊन पाठवायचे आणि दोन पैसे मिळल्यानंतर दोन वेळची पोटपूजा करायची असा त्यांचा नित्यक्रम आहे. मात्र, निसर्गाला त्यांचे हे जगणं पाहवले नाही की काय मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामुळे त्यावरही संक्रांत कोसळली. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधामध्ये शिथिलता आली की, पोटपूजा होते. कधी कोणाला दया आली तर देतात चार-दोन रुपये नाही, तर शिल्लक अन्न, कोणी बिस्किटचे पुडे देऊन निघून जातात. पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून पुन्हा अशा मंडळींच्या येण्याची वाट आम्ही पाहतो, ती फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी.

पदपथ, उड्डाण पुलाखाली किंवा मिळेल त्या ठिकाणी पाठली धरणी आणि उशाला धोंडा असा वर्ग या कामामध्ये गुंतवून चरितार्थ चालवतो. मात्र, कोरोनाने त्यांचाही रोजगार हिरावून घेतला. मात्र, तरीही हा वर्ग हातावर हात ठेवून बसला नाही, त्यांनी लिंबू-मिरची तारेला गुंतवून वाहनचालक-दुकानदारांना विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यावरही बंधने असल्यामुळे या वर्गावर कोरोना महामारीबरोबर उपासमार आल्याचे पाहायला मिळत आहे. कोणी भावनिक होऊन, तर कोणी दया दाखवत खिशामध्ये हात घालून जमेल तेवढी रक्कम देतात.

हेही वाचा: ज्वारी, डाळींच्या दरात मोठी घट; क्विंटलमागे 800-1000 रुपयांची घसरण

उन, वारा, थंडी, पावसाळा असो आमच्या नशिबी पोटासाठी संघर्ष आहे. सणवार असो वा नित्यक्रम असो दररोज नवे ग्राहक पाहायचे आणि त्यांच्याकडे लहानग्यांना पाठवून विक्री करतो. पोटासाठी’ ही ओळ आपोआपच ओठावर येते. तळजाईवर मी चालण्याचा व्यायाम करतो. त्या वेळी ‘चलते चलते यूं ही कोई मिल गया था’ हे गाणं आपोआप आठवत राहतं आणि माझी नजर सैरभैर होते.

loading image