पोलिसांच्या भीतीने पळालेले फॉर्च्युनरसह धरणावरून कोसळले... 

malshej.
malshej.

ओतूर (पुणे) : माळशेज घाटातील चेक नाक्‍यावर चौकशीच्या भीतीने आडमार्गाने पळून जाताना फॉर्च्यूनर मोटारीला झालेल्या अपघातात दोन जण ठार; तर तीन जण जखमी झाले. 

हा अपघात मंगळवारी मध्यरात्री बारादरम्यान झाला असून, यात सत्यवान मच्छिंद्र पानसरे (वय 35, रा. घाटघर, ता. जुन्नर) व उत्तम मारुती घोडेकर (वय 47, रा. घाटकोपर, मूळ रा. वडगाव काशिंबेग, ता. आंबेगाव) हे ठार झाले; तर ताईबाई मारुती घोडेकर (वय 60), रूपाली मारुती घोडेकर (वय 45), केतन उत्तम घोडेकर (वय 16) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे. 

याबाबत ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी माहिती दिली की, ठाणे बाजूकडून आलेल्या फॉर्च्यूनर गाडीतील व्यक्तींनी माळशेज घाटात चेक नाक्‍यावर तैनात कर्मचाऱ्यांना गाडीचा पास दाखवला. परंतु, कर्मचाऱ्यांना पासवर नमूद व्यक्ती व गाडीतील व्यक्ती याबाबत संशय आला. त्यामुळे गाडीतील व्यक्तीचे ओळखपत्र तपासणीसाठी गाडी बाजूला लावायला सांगितली, मात्र अंधाराचा फायदा घेऊन गाडीचालक गाडी घेऊन पळून गेला. तेथून दीड किलोमीटर अंतरावरील पिंपळगाव जोगा धरणाच्या मागील भिंतीवरून खिरेश्वरकडे जाताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी भिंतीवरून कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक व एक जण, असे दोघे जागीच ठार झाले; तर इतर तीन जण जखमी झाले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

या अपघाताची नोंद ओतूर पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आकाश शेळके व इतर करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com