शिवापूरमधील नागरिकांसाठी हा अहवाल ठरलाय...

Corona Test
Corona Test

खेड-शिवापूर (पुणे) : हवेली तालुक्यातील शिवापूर येथुन पुण्याला नेत असताना मृत झालेल्या महिलेच्या नातेवाईकांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली. त्यामुळे शिवापूरवासीयांना दिलासा मिळाला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्याहून एक महिला काही दिवसांपूर्वी शिवापूर येथे नातेवाईकांकडे आली होती. दम लागत असल्याने शनिवार (ता. 16)  तिची प्रकृती बिघडली. त्या महिलेला ससून रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतर तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु, त्या महिलेचे नमुने कोरोना चाचणीसाठी देण्यात आले होते की नाही, याबाबतच निश्‍चित माहिती मिळत नव्हती. त्यामुळे या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, हे समजण्यास अडचण येत होती.

त्यामुळे खबरदारी म्हणून त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्यात आली. 
त्या महिलेच्या नातेवाईकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे शिवापूरवासीयांना दिलासा मिळाला आहे. 

याबाबत हवेली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात म्हणाले, "संबंधित मृत महिलेला कोरोना होता किंवा नाही, हे समजण्यासाठी त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या सर्वांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही." 
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com