पूरग्रस्त भागातील पंचनामे करा

Ajoy-mehta
Ajoy-mehta

पुणे - पूरस्थितीनंतर त्या भागात सुरू असलेल्या मदत व पुनर्वसनाच्या कामाचा आढावा मुख्य सचिव अजोय मेहता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बुधवारी घेतला. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील पूरग्रस्त जिल्ह्यांमधील मदत व पुनर्वसनाच्या कामाची माहिती दिली.

मुख्य सचिव मेहता म्हणाले, ‘‘पूर परिस्थितीत सर्व विभागांनी चांगले काम केले आहे. परंतु, मदत व पुनर्वसनाचे मोठे काम बाकी आहे. कोणीही बाधित व्यक्ती मदत व पुनर्वसनापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांशी समन्वय राखत युद्धपातळीवर काम करावे.’’

राज्यात या वर्षी काही भागांत गंभीर पूरस्थिती उद्‌भवली आहे. परंतु, मराठवाड्यासह काही भागांत भीषण पाणीटंचाईचे सावट आहे. या स्थितीत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून मदतीचे काम करण्याची गरज आहे. आवश्‍यक ठिकाणी चारा छावण्या आणि पाण्याचे टॅंकर सुरूच ठेवावेत. टॅंकर आणि चारा छावण्यांची बिले तातडीने अदा करावीत. पूरबाधित भागातील घरे, जनावरे, शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत. त्याआधारे मदत व पुनर्वसनाचे काम नियोजनबद्धरीत्या करावे. सानुग्रह अनुदानाच्या वाटपाचे येत्या दोन आठवड्यांत पूर्ण करावे. 

'पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यासाठी विमा कंपन्यांकडून दररोज आढावा घेण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com