पूरग्रस्तांसाठी शहरातून मदतीचा ‘महापूर’

नवी सांगवी - मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेतर्फे मदत.
नवी सांगवी - मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेतर्फे मदत.

पिंपरी - कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शहरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. रोख रकमेसह जीवनावश्‍यक वस्तूही पाठविण्यात येत आहेत. यासाठी अनेक सेवाभावी संस्था, संघटना सरसावल्या आहेत.

भोसरीतून २५ ट्रक रवाना
भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या ‘एक हात पूरग्रस्तांसाठी’ या उपक्रमांतर्गत साहित्य असलेले २५ ट्रक त्यांच्यामार्फत पाठविण्यात आले. लांडगे स्वतः ट्रकसोबत गेले. यापूर्वी १५ टेंपो साहित्य पाठविले. तसेच, १५० कार्यकर्ते पूरग्रस्त भागात कार्यरत आहेत. 

‘विहिंप’ची आरोग्यसेवा
विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलामार्फत आपत्कालीन व आरोग्यसेवा पथक रवाना झाले. दोन रुग्णवाहिकांसोबत तज्ज्ञ डॉक्‍टर, सेवकांचे हे पथक आहे. यात भास्करराव गोडबोले, पी. एन. पुजारी, डॉ. प्रदीप उगले, डॉ. राजेंद्र चौधरी, अनिल देवराव, शेखर धुरपते, मुकुंद पलोड यांचा समावेश आहे. 

‘घरकुल’ची पूरग्रस्तांना मदत
घरकुल परिसरातील व्यापारी व रहिवाशांनी जमा झालेले धान्य, कपडे, चादर, ब्लॅंकेट पाठविल्याचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी सांगितले. 

ईदचा खर्च टाळून मदत
बकरी ईदचा खर्च टाळून आझाद शेख यांनी पूरग्रस्तांना पाच हजार रुपयांची मदत दिली. भाजप शहर कार्यालयात ते शिपाई आहेत. 

विद्यार्थ्यांची मदत फेरी
मावळमधील  गेव्हंडे खडक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात फिरून धान्य व आर्थिक मदत गोळा केली. अरविंद रोकडे, संभाजी खैरे, प्रदीप भोसले, दत्ता खैरे, नवनाथ पासलकर, किशोर खैरे उपस्थित होते.

प्रभाग नऊमधून मदत
नगरसेवक समीर मासुळकर व राहुल भोसले जीवनावश्‍यक वस्तू घेऊन मदतीसाठी गेले. मासुळकर कॉलनी, नेहरूनगर भागातील नागरिकांनी केलेल्या मदतीतून विविध वस्तूंचे दोन ट्रक पाठविले. एकता, लोकमान्य, गुरुदत्त मित्रमंडळे, नेहरूनगर सिद्धार्थ संघ व मासुळकर कॉलनी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. 

मुस्लिम बांधवांची मदत
नेहरूनगर येथील तवकल्ला मशीद मुस्लिम बांधवांनी शंभर ट्रॅक पॅंट, ५० लेडीज टॉप, २५ लहान मुलींचे टॉप, १२५ मोठ्या आकाराचे टी-शर्ट, १०२ साड्या अशी मदत त्यांनी पाठवली. 

शहर काँग्रेसची मदत
शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या पुढाकारातून असंघटित कामगार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गृहोपयोगी व शालेय साहित्य पाठविले. 

‘भैरवनाथ’तर्फे डॉक्‍टरांचे पथक
भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघाचे अध्यक्ष योगेश लांडगे आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली १२ तज्ज्ञ डॉक्‍टर व दीडशे मदतनीस पूरग्रस्तांची आरोग्यसेवा करीत आहेत. सहा लाखांची औषधे पाठविली आहेत. महापौर राहुल जाधव यांनीही पूरग्रस्तांची भेट घेतली. 

आरोग्य पथक रवाना 
डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे वैद्यकीय आरोग्य पथक रवाना झाले. कोल्हापूर व सांगली अशी दोन पथके तयार करण्यात आली आहेत.

सांगवीतून मोठी मदत
मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेकडे नवी सांगवी, पिंपळे गुरव, समतानगर, गणेशनगर भागांतील नागरिकांनी जीवनावश्‍यक वस्तू जमा केल्या. यात गहू, ज्वारी, तांदूळ, बिस्किटे, साड्या, ब्लाऊज पीस, डाळ, साखर, साबण, कपडे पाठविले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com