Pune Flood Alert: पुण्यात पूरस्थितीची चाहूल! खडकवासलातून मोठा विसर्ग, एकतानगरातील दोन सोसायट्यांत पाणी शिरले, महापौर नागुपरेंची पाहणी

Pune flood alert after heavy rainfall: खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने विसर्गात मोठी वाढ; मुठा नदीकाठच्या सखल भागांना सतर्कतेचा इशारा, एकतानगरातील दोन सोसायट्यांत पाणी शिरल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात
Mayor inspects flood-affected areas in Pune

Mayor inspects flood-affected areas in Pune

esakal

Updated on

पुणे : पुणे शहरासह खडकवासला धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. पहाटे ५.३० नंतर धरणातून २७,२०३ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या सखल भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यावरील एकतानगर परिसरातील द्वारका आणि जलपूजन या दोन सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली असून आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल व महानगरपालिकेची यंत्रणा तातडीने घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com