Pune : कऱ्हा नदीच्या महापुराने खळदकर धास्तावले

पुरंदर तालुक्यामध्ये सोमवार झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कऱ्हा नदीला प्रचंड असा महापूर आला
Pune : कऱ्हा नदीच्या महापुराने खळदकर धास्तावले
Summary

पुरंदर तालुक्यामध्ये सोमवार झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे कऱ्हा नदीला प्रचंड असा महापूर आला

खळद : "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती" यामुळे आम्ही वाचलो अशी संतप्त भावना व्यक्त करत आता तरी प्रशासनाने जागे व्हा, आमचा विचार करा, आमचे माळिण होण्याची वाट पाहू नका अशी मागणी खळद ता.पुरंदर येथील नागरीकांनी केली.

पुरंदर तालुक्यामध्ये सोमवार झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे क-हा नदीला प्रचंड असा महापूर आला होता. या महापुराने खळद गावामध्ये पाणी शिरल्याने नागरिक धास्तावले होते व भयभीत नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. सोमवारी रात्री येथे किर्तन सोहळा संपन्न होत असताना पावसाला सुरूवात झाली.

यावेळी तालुक्यात झालेल्या पावसाने क-हा नदीच्या पात्राच्या पाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व हे पाणी रात्री१ वाजण्याच्या सुमारास गावामध्ये शिरले व गावचा चव्हाणवस्ती,घोडके मळा,खंडोबाचीवाडी या वाड्यावस्त्यांचा तर एखतपूर-मुंजवडी सह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे बंद झाला.

यामुळे नागरिकांना सोयीस्कररित्या बाहेर पडता येत नव्हते अशा भयभीत वातावरणातच नागरीकांनी ही रात्र पूर्णपणे जागून काढली. या भागात सध्या हयात असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी आयुष्यामध्ये २५ सप्टेंबर २०१९ रोजी रात्रीच्या वेळी असाच पहिला महापूर अनुभवला होता.

यावेळी मोठ्या प्रमाणावरती जीवीत व वित्त हानी झाली होती. यामध्ये अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला . या आठवणींच्या जखमा घेऊनच या भागातील नागरिक प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपला जीव मुठीत धरुण जगत आहे.या भागातील नागरिकांना शांतपणे कधीही शांत झोप लागत नाही.कधीही गावांमध्ये पाणी शिरून माळीण सारखी घटना घडत संपूर्ण गाव वाहून जाते की काय अशी भीती येथील नागरिकांना सतावत असते रात्रीच्या पावसाने या मध्ये आणखी भर पडली.

या पावसाने गावामध्ये शेती पिकांसह कोट्यावधी रुपयांच्या रस्त्यांसारख्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. याबाबत तहसीलदार रूपाली सरनोबत,तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव, कृषी पर्यवेक्षक प्रवीण अडसूळ यांनी गावाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली व नुकसानी बाबत शासनाकडे अहवाल पाठविला जाईल असे सांगितले.

"या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांनी तातडीने गावचे तलाठी ,ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करून आपले पंचनामे करून घ्यावेत जेणेकरून त्यांना नुकसान भरपाई देण्यास मदत होईल. "

रूपाली सरनोबत, तहसीलदार पुरंदर.

" गावाच्या बाजूने क-हा नदी वाहत असून संपूर्ण गावाला मोठ्या प्रमाणावरती धोका संभवतो, येथे संरक्षक भिंत होणे गरजेचे आहे याबाबत खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संजय जगताप, माजी आमदार विजय शिवतारे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते यांच्यासह अनेक मान्यवरांना वारंवार पत्र व्यवहार करून संरक्षण भिंतिची मागणी केली आहे. मात्र अद्यापर्यंत याची कोणीही दखल घेतली नाही तरी भविष्याची मोठी हानी टाळण्यासाठी येथे संरक्षण भिंतीसाठी सर्वांच्या वतीने सामुदायिक प्रयत्न करीत मोठा निधी मिळणे गरजेचे आहे."

योगेश कामथे, ग्रामपंचायत सदस्य, खळद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com