पोट भरू की घरातील वस्तूंची राखण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पुणे : घरात चिखलाचे साम्राज्य. त्यामुळे तुटक्‍या फुटक्‍या संसाराला सोडून जाता येत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जायचे की या संसाराच्या वस्तूंची राखण करत बसायचे, ही व्यथा आहे कचरावेचक लक्ष्मी लंकेश्‍वर यांची. 

पुणे : घरात चिखलाचे साम्राज्य. त्यामुळे तुटक्‍या फुटक्‍या संसाराला सोडून जाता येत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जायचे की या संसाराच्या वस्तूंची राखण करत बसायचे, ही व्यथा आहे कचरावेचक लक्ष्मी लंकेश्‍वर यांची. 

पुण्याच्या येरवडा येथील मुळा-मुठा नदीकाठावरील डॉ. चिमा उद्यानाशेजारी घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे कुटुंबांनी कर्नल यंग विद्यालयात आश्रय घेतला आहे.

लंकेश्‍वर म्हणाल्या, 'मी कोरेगाव पार्क येथे घंटा गाडीवर कचरावेचक म्हणून काम करत आहे. गेली कित्येक वर्षे नदी काठावर राहत आहे. पुराचे पाणी गेल्यामुळे सर्व संसार पाण्यात गेला. महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात जाणाऱ्या मुलीला कोरेगाव पार्कला भावाकडे ठेवले असून, दोन मुलांसह कर्नल यंग विद्यालयात राहत आहे. मंगळवारी संध्याकाळी पुराचे पाणी ओसरल्यानंतर घराची स्वच्छता करण्यासाठी आले; मात्र घरात सर्वत्र पसरलेला चिखल पाहून त्या हाताश झाल्या. घर साफ करू की दुसऱ्या दिवशी कामाला जाऊ.' 

तसेच परिसरात राहणाऱ्या आशा खंडागळे, नंदा ढेरे, मंगल राजगुरू यांनासुद्धी स्वत:ची व पोरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जावे की घरातील वस्तूंची राखण करत बसावे, असा प्रश्‍न पडला आहे. ताडीगुत्ता, चिमा उद्यान येथील पूरग्रस्तांच्या मदतीला नगरसेवक अथवा येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अद्याप आले नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले; मात्र गेल्या तीन दिवसांपासून आदर्श मित्रमंडळाने जेवणाची व्यवस्था केली असल्याचे रहिवाशांनी सांगितले. 

नवीन घरातील सामान चोरीला 
लंकेश्‍वर यांना येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने हडपसर वैदू वाडीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातर्गत घर दिले होते. घरातील सामान नवीन घरात ठेवून कुलूप लावून त्या आल्या. दुसऱ्या दिवशी त्या राहण्यासाठी जाणार होत्या; मात्र नवीन घरी जाण्याअगोदरच घरातील सर्व सामान चोरीला गेले. ऐवढेच नव्हे तर घरातील विद्युत उपकरणे, वायरिंगसुद्धा चोरीला गेले. त्यामुळे परत जुन्या घरी आल्याचे लंकेश्‍वर यांनी सांगितले. 

फोटो : 1147 
येरवडा : पुराच्या पाण्यामुळे घरात शिरलेल्या चिखलाचे साम्राज्य पाहून हाताश झालेल्या लक्ष्मी लंकेश्‍वर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flooding the Mula-Mutha River at Yerwada