पुण्यात येणाऱ्यांचा ओघ कमी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

पुणे - शिक्षणक्षेत्रासह वाहन उद्योगातील भरभराट आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे (आयटी) पुणे शहराचे नाव जगाच्या नकाशावर ठळक होत राहिले. सुरवातीच्या काळात रोजगारनिर्मिती झाल्याने पुण्याकडील ओघ वाढला. मात्र, विविध कारणांमुळे आता 

पुण्यात येणाऱ्यांचा ओघ घटू लागला असून, गेल्या सात वर्षांत हे प्रमाण दोन टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नमूद केले आहे. पुढील तीन वर्षांत तो आणखी घटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 

मुख्यतः आयटीसह वेगवेगळ्या उद्योगांवरील मंदीचे सावट, त्याचा रोजगारनिर्मितीवर झालेला परिणाम आणि सेवा क्षेत्रात सहज उपलब्ध होणारे मनुष्यबळ यामुळेच पुण्यात स्थलांतरित होण्याचा ओघ कमी होण्याची कारणे त्या-त्या क्षेत्रातील मंडळींनी सांगितली. 

जागतिक पातळीवरील आयटी कंपन्यांनी पुण्याला पसंती दिल्याने रोजगारनिर्मिती वाढली. त्यामुळे 2000 मध्ये शहरातील बांधकामासह विविध सेवा क्षेत्र विस्तारले. परिणामी, 2001 पासून महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या सीमा ओलांडून पुण्यात येणाऱ्यांचा ओघ वाढला. तो पुढील दहा वर्षे कायम राहिला. त्यात रोजगारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. या काळात लोकसंख्येच्या प्रमाणात पुण्यातील स्थलांतरितांचे प्रमाण हे 12 टक्के इतके होते. मात्र, 2012 पासून काही उद्योगांना मंदीची झळ बसू लागली आणि पुढे तिचा परिणाम वाढला. दरम्यान, आयटी उद्योग भारतातील अन्य राज्यांतील शहरांकडे वळू लागला. तेव्हाच, या उद्योगासाठी जागतिक पातळीवरही "लो कॉस्ट डेस्टिनेशन'चा ( उद्योगासाठी कमी खर्चात सोयी-सुविधा मिळणारे ठिकाण) पर्याय खुला झाला. त्यातच, आयटीसह विविध उद्योगांमधील मंदीमुळे रोजगाराचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे सात वर्षांत स्थलांतरिताचे प्रमाण 12 वरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाले आहे. पुढील काही वर्षांत आणखी घट होण्याचा अंदाजही अहवालात मांडण्यात आला आहे. दरम्यान, बांधकाम क्षेत्रात गेल्या तीन वर्षांत मंदी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: The flow of people coming down to Pune