
लहानपणी गावाकडे यात्रेत मिळणाऱ्या बासरीचे आकर्षण जाधव यांना निर्माण झाले. बासरी शिकण्यासाठी कुठेही शिकवणी न लावता. जाधव २० वर्षांपासून सुंदर अशी बासरी वाजवत आहेत.
गोखलेनगर(पुणे) : शिवाजीनगर, डेक्कन परिसरात वाहनांच्या गर्दीत, माणसाच्या वर्दळीतून अचानक बासरीचा सुरेल आवाज ऐकू येतो. हा सुरेल आवाज ऐकू येतो तो म्हणजे बासरीवाले आजोबा यांच्याकडून! लाचार न होता वयाच्या ७२ व्या वर्षी देखील स्वाभिमानाने जगाणारे गंगाधर ईश्वर जाधव उर्फ बासरीवाले आजोबा.
लहानपणी गावाकडे यात्रेत मिळणाऱ्या बासरीचे आकर्षण जाधव यांना निर्माण झाले. बासरी शिकण्यासाठी कुठेही शिकवणी न लावता. जाधव २० वर्षांपासून सुंदर अशी बासरी वाजवत आहेत.
मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली
हेमंत कुमार, किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर यासह जुन्या गाण्यावरती बासरीवादन करण्याचे ज्ञान त्यांच्यामध्ये आहे. ते पर्वती या ठिकाणी रहायला असून दररोज गरवारे पूल, जंगली महाराज रस्ता, संभाजी उद्यान, हॉटेल गुडलक, फर्ग्यूसन महाविद्यालय रस्ता या ठिकाणी पदपथावर बसून बासरी वादन करतात.
दिवसभर पदपथावरून जाणारे - येणारे विद्यार्थी, नागरिक आपापल्या आवडीनुसार गाणी सांगतात त्याप्रमाणे जाधव बासरीवादन करतात. यामधून नागरिक सहखुशीने जाधव यांना दहा, वीस रुपये देतात या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह होते असं ते सांगतात. घरच्यांनी केलेल्या सहकार्यामुळे जाधव रस्त्यावर बसून देखील बासरीवादन करतात. 'रस्त्यावर बसून बासरी वाजवण्यासाठी लाज वाटत नाही' असं देखील ते म्हणाले.
कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू
"सुर, ताल याचे ज्ञान आहे. बासरीवादन करण्यासाठी लहानपणापासून प्रयत्न केला.नागरिकांनी संगिताकडे वळावं.जिद्द चिकाटी सोडू नये."
- गंगाधर ईश्वर जाधव उर्फ (बासरीवाले बाबा)