पाच वर्षांत केलेल्या कामांवर भर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुणे - ‘कसबा पेठ- सोमवार पेठ या प्रभाग क्रमांक १६ (ब) मधून महापालिकेची निवडणूक लढत असलेले भाजपचे उमेदवार गणेश बिडकर यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचारावर भर दिला आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांवरच त्यांनी प्रचारात भर दिला आहे. 

महापालिकेची निवडणूक ही आता केवळ १०-१२ दिवसांवर आली असल्याने प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्याच्या दृष्टीने बिडकर प्रयत्नशील आहेत. आपल्या प्रभागातील १६ (ड) मधील भाजपचे उमेदवार योगेश समेळ आणि १६ (क) मधील उमेदवार वैशाली सोनवणे यांच्यासह एकत्रित प्रचाराची रणनीती त्यांनी आखली असून, सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यांत मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फौज हे बिडकर यांचे बलस्थान आहे.  कार्यकर्त्यांसोबत प्रचाराची पुढील दिशा निश्‍चित करण्यासाठी बिडकर यांनी शुक्रवार, ता. १० फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता त्वष्टा कासार मंदिरात विशेष कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन 

केले आहे. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एका कार्यकर्त्याने व्यक्त केला.

बिडकर हे स्वतः सर्व मतदारांपर्यंत पोचत आहेतच; पण प्रत्येक कार्यकर्त्यालाही प्रभागातील ठराविक परिसर वाटून देण्यात आला आहे. ‘परिसरातील सर्वच नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोणी औक्षण करत आहे, तर कोणी साखर, पेढा देत विजयासाठी त्यांना शुभेच्छा देत आहेत,’ अशी माहिती प्रचारात पहिल्या दिवसापासून सक्रिय असलेल्या एका कार्यकर्त्याने दिली.

Web Title: Focus on the work of five years