धुक्‍यात हरवली वाट

नाणे मावळात दाट धुक्‍यामुळे नागरिक गारठले.
नाणे मावळात दाट धुक्‍यामुळे नागरिक गारठले.

पिंपरी - विदर्भातील अनेक भागात वादळी पाऊस झाल्याचा परिणाम शहरातील वातावरणावर झाला आहे. शहराच्या किमान तापमानात घट होऊन शुक्रवारी (ता. ३) ते १० अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यामुळे थंडीच्या कडाक्‍याबरोबरच सकाळी साडेनऊपर्यंत दाट धुके शहरवासीयांनी अनुभवले. 

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा कमी झाला होता. मात्र, मोसमातील बदलामुळे गुरुवारी रात्रीपासून शहरात थंड वारे वाहू लागले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हवेतील गारव्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पहाटेच्या वेळी दाट धुके पसरले होते. सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला. शहरात पहाटे धुके, तर दिवसभर गारठा जाणवत होता. वाहनचालकही वेगमर्यादा पाळत वाहन चालवत होते.  

गेल्या काही दिवसांपासून दिवसा ऊन, तर संध्याकाळी थंडी जाणवत होती. त्याचा परिणाम जनजीवनावरही होऊ लागला आहे. बाजारपेठही सकाळी उशिरा सुरू होत आहे. सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही थंडीची हुडहुडी जाणवू लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कपाटात ठेवलेली स्वेटर, मफलर, जर्किंग, शाल, कानटोप्या, हातमोजे, रजई बाहेर काढली आहे. काहींनी नव्याने ऊबदार कपड्यांची खरेदीसाठी केली आहे. गारठा झोंबू लागल्याने शेकोट्याही पेटविल्या जात आहेत. दूध व चहाच्या ठेल्यावरही चहाप्रेमींची गर्दी वाढू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com