esakal | जुन्नर पर्यटन विकासासाठी पाठपुरावा सुरू : खासदार डाॅ.कोल्हे
sakal

बोलून बातमी शोधा

Follow Junnar tourism development begins said MP Dr Kolhe


खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ''जुन्नर पर्यटन विकास संस्थेने केलेल्या मागण्या व सूचना पर्यटन विकासाला पोषक आहेत.''

जुन्नर पर्यटन विकासासाठी पाठपुरावा सुरू : खासदार डाॅ.कोल्हे

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात पर्यटन विकासासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शिवसंस्कार सृष्टीचा आराखडा बनवण्याचं काम सुरू  आहे.अशी माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.

दिवाळी निमित्ताने डॉ. कोल्हे हे नारायणगाव येथे आले होते. या वेळी जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हाडवळे, अध्यक्ष यश मस्करे, उपाध्यक्ष प्रा.राधाकृष्ण गायकवाड, सचिव जितेंद्र बीडवई, खजिनदार शिरीष भोर यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची भेट घेऊन जुन्नर तालुक्याचा पर्यटन विकास या संदर्भात चर्चा केली. या वेळी जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह, शिवप्रतीमा भेट देवुन खासदार डॉ. कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दत्ता बाळसराफ, सर्पदंश तज्ञ डाॅ.सदानंद राऊत, जितेंद्र हांडे - देशमुख, पत्रकार अशोक खरात,साहित्यिक संदीप वाघोले, अमोल कुटे, शिरीष डुंबरे आदी उपस्थित होते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ''जुन्नर पर्यटन विकास संस्थेने केलेल्या मागण्या व सूचना पर्यटन विकासाला पोषक आहेत.'' डॉ.कोल्हे पुढे म्हणाले,  ''पर्यटन विकासासाठी महामार्ग मजबूतीकरण, बाह्यवळण रस्ते, पुणे नाशिक रेल्वे, व इतर प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प पुर्ण होणार आहेत. जुन्नर तालुका हा पुणे, नाशिक, मुंबई आणि अहमदनगर  या चार मोठ्या शहरांपासुन सारख्या अंतरावर आहे. हा सुवर्ण चतुष्कोण गृहित धरून  पर्यावरण पुरक रहिवासी झोन'  म्हणून विकसित करण्याचा  माझा प्रयत्न आहे.''

जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या वतीने यावेळी तालुक्यातील पर्यटन स्थळे निश्चित करुन त्या ठिकाणी पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वछतागृह व्यवस्था करावी.दिशादर्शक,माहिती फलक व पर्यटन नकाशे लावावेत. लोककला संवर्धन करण्यासाठी विविध महोत्सव आयोजित करावे. गाईड प्रशिक्षण, कलाकुसर प्रशिक्षण देण्यात यावे.शिवजयंती महोत्सव सात दिवस करुन या निमित्ताने लोककला  प्रदर्शन, कृषी प्रदर्शन, शालेय स्पर्धा आयोजित कराव्यात आदी मागण्या केल्या.

हे वाचा - दिवाळीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक; 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

''पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पावसाळ्यात भिमाशंकर ते भंडारदरा हा ट्रेक रुट मी करणार आहे. तालुक्यातील जलाशयांमध्ये विविध  क्रिडा प्रकार सुरु करण्यासाठी व साहसी पर्यटन विकासासाठी प्रयत्न केला जाईल.''
-  खासदार डॉ.अमोल कोल्हे

loading image