Jayant Patil : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुकरण करा! जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र

Jayant Patil
Jayant Patil
Updated on

Jayant Patil : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. भाजप, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाअंतर्गत बैठकींचा सपाटा लावला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाला बळकटी मिळण्यासाठी पुण्यात कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनुकरण करा, असे जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात जयंत पाटील यांनी हा कानमंत्र दिल्याची माहिती आहे. जयंत पाटील पुण्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

Jayant Patil
Supreme Court : डॉ. दाभोलकर हत्येचा तपास बंद करण्यासाठी याचिका; SCची सीबीआयला नोटीस

जयंत पाटील म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५, १० लोक रोज सकाळी एकत्र येतात आणि कवायत करतात. आपण रोज नाही पण किमान कार्यकर्त्यांनी प्रत्येक शनिवारी एकत्र यावे. पक्षाची प्रकृती चांगली होईल. पक्ष तंदुरुस्त होईल. पक्षात चर्चा झाली पाहीजे.

आपला पक्ष हुकूमशाहीचा नाही लोकशाहीचा आहे. शरद पवार यांनी लोकशाहीला प्राधान्य दिले आहे. संघामध्ये लोकं गोळा होतात आणि चर्चा करतात. मी सांगतो शनिवार हा बजरंग बलीचा वार आहे. त्यामुळे या दिवशी चर्चा करा.

Jayant Patil
Karnataka CM: काँग्रेसचं चाललंय काय? मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला केसीआर, केजरीवालांना निमंत्रण नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

What is the Shaktipeeth Highway project?
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Jayant Patil  devendraFadnavis meeting
Marathi News Esakal
www.esakal.com