Karnataka CM: काँग्रेसचं चाललंय काय? मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला केसीआर, केजरीवालांना निमंत्रण नाही

Karnataka CM
Karnataka CMesakal
Updated on

बंगळूरुः कर्नाटक विधानसभेच्या निकालात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल १३५ जिंकून भाजपला ६६ जागांवर रोखून धरलं. आता कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारचा शपथविधी होत आहे.

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु होती. डीके शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यात पक्षाने सिद्धरामैय्या यांना संधी दिली आहे. २० मे रोजी त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होईल.

Karnataka CM
Devendra Fadnavis : "तुम्ही सांगा...मी पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो" जे.पी. नड्डांसमोरच फडणवीस असं का म्हणाले?

शपथविधीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. या सोहळ्यासाठी देशातील विविध पक्ष आणि बड्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. याची एक लिस्ट पक्षाने तयार केलीय.

मात्र या लिस्टमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह अनेकांची नावं यामध्ये नाहीत. तर बिहारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.

Karnataka CM
Dhule Municipal Corporation Fraud: आस्था घोटाळा प्रकरणी अहवाल मागविला; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश

सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री?

सिद्धरमय्या १९८३ साली पहिल्यांदा अपक्ष उमेदवार म्हणून कर्नाटक विधानसभेत निवडून आले. १९९४ मध्ये जनता दल सरकारमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री झाले. एच. डी. देवेगौडा यांच्यासोबत वाद झाल्यानंतर जनता दल सेक्युअरची साथ सोडली. २००८ मध्ये काँग्रेसचा हात पकडला.

सिद्धरमय्या २०१३ ते २०१८ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. आतापर्यंत त्यांनी १२ निवडणुका लढल्या. त्यापैकी नऊ निवडणुकांमध्ये जिंकले. सात किलो अन्न देणारी भाग्य योजना, शाळेत जाणाऱ्या मुलांना १५० ग्राम दूध आणि इंदिरा कँटीन या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या योजना आहेत.

सिद्धरमय्या यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४७ रोजी म्हैसूर येथे झाला. तेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते. त्यांचे वडील म्हैसूर जिल्ह्यात के. टी. नरसीपुराजवळ शेती करत होते. आई बोरम्मा गृहिणी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

DK Shivakumar Net Worth
DK Shivakumar new Chief Minister of Karnataka
dk shivkumar
why did Siddaramaiah resign
Marathi News Esakal
www.esakal.com