साडेतीन किलोमीटरच्या अंतरासाठी पाऊणतास!

गुगलही सुचविते उलटा पर्याय; कात्रज-कोंढवा रस्त्यांवरील वाहतूक कोंडी
साडेतीन किलोमीटरच्या अंतरासाठी पाऊणतास!

कात्रज : कात्रज चौक ते खडीमशीन चौक असे कात्रज-कोंढवा रस्त्याचे एकूण साडेतीन किलोमीटर अंतर आहे. मात्र, हे अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तास लागत आहे. या रस्त्यांवरील वाहतूककोंडीने वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. मात्र, कोणताही पर्याय नसल्याने या रस्त्याचा वापर करावाच लागतो. धुळीचे तर अक्षरशः लोट तयार होत आहेत. रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्यांचे चेहरे धुळीने माखत असून प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.

रस्त्याचे सुरू असलेले काम, रस्त्यांवर पडलेले खड्डे, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक आदी कारणांमुळे कात्रज-कोंढवा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. त्यात या रस्त्यावरून सांयकाळच्या वेळी तासाला १२ ते १४ हजार वाहनांची ये-जा होते. त्यामुळे आधीच रस्ता अरुंद आणि त्यात मोठ्या प्रमाणांवर वाहनांची ये-जा असल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसून येते. कोंडी सोडविण्यासाठी प्रशासन मात्र कुठल्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही. रस्त्यांवरील साधे खड्डेही व्यवस्थित बुजविण्याची तसदी महापालिका प्रशासनाने मागील काही दिवसांपासून घेतलेली दिसत नाही.

सायंकाळी ५ ते ९ या वेळात तर या रस्त्यांवरून प्रवास करावयाचा असल्यास किमान एक तास अधिकचा काढूनच या रस्त्यांवर यावे लागते. अशातच राजस चौकापासून गोकुळनगर चौकांपर्यंत मोठ्या प्रमाणात कोंडी होते. गोकुळनगर चौकापासून रस्त्यांवर दुभाजक असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळतो.

गुगलही सुचविते वेगळा पर्याय

अनेकवेळा आपण प्रवासासाठी गुगल मॅपचा आधार घेत असतो. पंरतु, कात्रज चौक ते खडीमशीन चौक असा प्रवास करायचा असल्यास गुगलही आपल्याला वेगळा पर्याय सुचविते. कात्रज चौकातून निघ्याल्यास राजस चौकापर्यंत येण्यासाठी कोणताही दुसरा पर्याय नाही. नंतर मात्र राजस चौकातून डावीकडे वळून विद्यानगरमार्गे वळसा घालून पुन्हा कोंढवा रस्त्यांवर येण्याचा मार्ग गुगल मॅप सुचवितो. तसेच, पुढे कोंढवा परिसरातही थेट खडीमशिन चौकात न जाता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारातून डावीकडे वळून कै. दशरथ मरळ चौकातून खडीमशीन चौकात येण्याचा उलटा पर्याय गुगल सुचविते. यावरून कात्रज कोंढवा रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा अंदाज येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com