Vasant More: पुणे लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच 3 माजी नगरसेवक आमनेसामने? वसंत मोरे लोकसभेची निवडणूक लढणार अपक्ष?

Vasant More: मोहोळ, धंगेकर आणि मोरे यांची लढत झाल्यास पुणे लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच तीन माजी नगरसेवक आमनेसामने पाहायला मिळणार आहेत.
Vasant More
Vasant MoreEsakal

कात्रज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवक वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होती. अशातच त्यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

महायुतीकडून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला आहे. ‘मनसे’ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटी चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

Vasant More
Sharad Pawar on Arvind Kejriwal Arrest: केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागेल; शरद पवारांनी केलं मोठं भाकीत

मोरे म्हणाले, लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊनच मी पक्षासोबत फारकत घेतली आहे. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणारच! निवडणूक न लढविल्यास ज्या लोकांनी माझ्यासाठी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले आहेत, त्यांचा हा अपमान असेल. पुणे शहराचा विकास आणि कात्रज पॅटर्न शहरात राबविणे हेच माझे ध्येय असणार आहे. मी १५ वर्षे नगरसेवक असताना शहराला दाखविलेला विकास महत्त्वाचा आहे.

Vasant More
Supriya Sule: आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांना सुरक्षा पुरविण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी; काय आहे कारण?

कोरोना काळात मी केलेले काम पाहून लोक मला मतदान करतील आणि मी पुणेकरांचा उमेदवार असेल. मोहोळ, धंगेकर आणि मोरे यांची लढत झाल्यास पुणे लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच तीन माजी नगरसेवक आमनेसामने पाहायला मिळणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com