परदेशी नोकरीच्या आमिषाने तरुणाला तीन लाखांचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - फेसबुकवरील जाहिरातीद्वारे परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने एका युवकास तीन लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे - फेसबुकवरील जाहिरातीद्वारे परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने एका युवकास तीन लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

चिन्मय देशमुख (वय 22, रा. कसबा पेठ) याने यासंदर्भात फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिन्मय यांच्या फेसबुक अकाउंटवर एका अज्ञात व्यक्तीने मलेशियामध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीची संधी, अशा आशयाची जाहिरात टाकली होती. त्यातील क्रमांकावरून चिन्मयने संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यास तत्काळ काही रक्कम त्याच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन जमा करण्यास सांगितली. त्यानुसार त्याने ती रक्कम भरली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने वेगवेगळी कारणे सांगून त्याच्याकडून एकूण तीन लाखांहून अधिक रक्कम घेतली. त्यानंतर चिन्मय त्या व्यक्तीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रतिसाद दिली नाही. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चिन्मयने फिर्याद दिली.

Web Title: foreign job bait gives the youth three lakhs