पढारवाडीला परदेशी पाहुण्यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

पिरंगुट - मुठा खोऱ्यातील पढारवाडी (ता. मुळशी) येथील शाळेला जयवंतराव गेणूजी सातपुते एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून स्वित्झर्लंडच्या पाहुण्यांनी भेट दिली. मुलांचे आदरातिथ्य पाहून पाहुणे भारावून गेले. त्यांनी शाळेचे कौतुक केले.

पिरंगुट - मुठा खोऱ्यातील पढारवाडी (ता. मुळशी) येथील शाळेला जयवंतराव गेणूजी सातपुते एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून स्वित्झर्लंडच्या पाहुण्यांनी भेट दिली. मुलांचे आदरातिथ्य पाहून पाहुणे भारावून गेले. त्यांनी शाळेचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी बनविलेले मुकुट व गुलाबांचे पुष्प देऊन पाहुण्यांचे मुलांनी स्वागत केले. मुलांनी इंग्रजीमधून भाषणे करून तसेच नाटक व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून परदेशी पाहुण्यांची मने जिंकली. येथील आदिवासी मुलांची शैक्षणिक गुणवत्ता पाहून पाहुणे खूष झाले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कपडे, शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप केले. या वेळी स्टीव्हन बेली, लॉरा शेरलॉक, थॉमस वेड, मॅट सिलेन्टो, मिहाल ड्रॉझ, संकेत भंडारी, श्रीलाल आचारी, अजित सातपुते, शंकर मारणे, प्रकाश सांगळे, भिवा गायकवाड, सुदाम पवार, कविता जगताप, दीपाली शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. पुणे येथील अजित सातपुते फाउंडेशनतर्फे या शाळेला वेळोवेळी शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य, कपडे, खेळाचे साहित्य पुरविल्यामुळे आदिवासी कातकरी समाजातील मुलांना शाळेची आवड निर्माण झाली. त्यामुळे शाळेचा पट आणि उपस्थिती वाढली. भोडे आणि वातुंडे येथील कातकरी वस्तीवरील मुले शिक्षण प्रवाहात आणून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. 

शिक्षक भिवा गायकवाड, सुदाम पवार व दीपाली शिंदे यांचे प्रयत्न व मार्गदर्शनामुळे आम्हाला कातकरी मुलांची व समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, असे अजित सातपुते यांनी सांगितले. सुदाम पवार यांनी फाउंडेशनने केलेल्या मदतीमुळेच आदिवासी मुलांना शाळेची आवड निर्माण झाली. आम्ही प्रेम, माया, आपुलकी दिली आणि फाउंडेशनने आर्थिक मदतीचा हात दिल्यामुळे शैक्षणिक प्रगतीला चालना मिळाल्याचे सांगितले.

फाउंडेशनतर्फे २५ मुलांचा खर्च
 मुठा खोऱ्यातील पंचवीस आदिवासी कातकरी गरीब, अनाथ मुलांना दत्तक घेऊन वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य, गणवेश अजित फाउंडेशनच्या वतीने पुरविले जाते. 
. फाउंडेशनच्या आर्थिक मदतीमुळेच आदिवासी व कातकरी समाजाची मुले मुख्य प्रवाहात. 
 

Web Title: foreigner visit to padharwadi