वारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई

महादेव पवार
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

पुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता वनविभागाचे वन कर्मचारी व वन अधिकारी एसआरएफचे जवान व वारजे पोलिस स्टेशनच पोलिस यांनी संयुक्तपणे सह्याद्री शाळेजवळ असणाऱ्या लाकडाच्या वखारीवर धडक कारवाई केली.

कोकाटे मिल या वखारीमध्ये असणारी लाकडे कापण्याची मशीन उध्वस्त केली.  तसेच पासलकर टिंबरच्या वखारीतून लाकडे कापण्याचे अनाधिकृत मशीन आरा गिरणी जप्त केली.यावेळी वनविभागाने एसआरएफचे जवान वारजे पोलिस स्टेशनचे अधिकारी बंदोबस्तासाठी ठेवले होते. अशा वखारीवर कारवाई होण्याची ही वारजेतील पहिलीच वेळ असल्याचे चर्चा या भागात सुरू होती.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forest Department action on wood warehouse