Leopard Conflict : मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी चार तासांत ११.२५ कोटींचा निधी मंजूर!

Government Action : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व खेड तालुक्यांतील वाढत्या मानव–बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, पुणे यांनी तातडीच्या उपाययोजनांसाठी ११ कोटी २५ लाख रुपये रक्कमेस प्रशासकीय मान्यतेचा आदेश मंगळवारी पुणे जिल्हा नियोजन समिती सचिव तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी पारित केला आहे.
Ambegaon–Junnar–Khed to Get Immediate Relief from Leopard Attacks

Ambegaon–Junnar–Khed to Get Immediate Relief from Leopard Attacks

sakal

Updated on

मुंबई : मंत्रालयात बिबट समस्या निवारणासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता वनमंत्री गणेश नाईक, माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व म्हाडा पुणेचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर चारच तासात निधी मंजुरीचे पत्र वळसे पाटील यांना देण्यात आले. प्रशासनाच्या तत्पर कार्यवाही बाबत याभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com