

Wildlife Tragedy: Leopard Found Dead on Pune-Solapur Highway
Sakal
पाटस : पुणे सोलापूर महामार्गावर रविवारी पहाटे चार वाजता (ता.२४)बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मृत बिबट्याच्या शरीरावर कोठेच गंभीर जखम किंवा रक्तस्राव दिसत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था झाली. मात्र, बिबट्याचा अपघाताने शरीरात अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. बिबट्याचा मृतदेह पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी वन कर्मचारी उशिरा पोचल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.