वनविभागाने विहिरीत पडलेल्या तरसला सुरक्षित बाहेर काढून दिले जीवदान

तरसाला सुरक्षितरित्या बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिल्याने त्याला जीवदान मिळाले आहे
तरसला सुरक्षित बाहेर काढून दिले
तरसला सुरक्षित बाहेर काढून दिलेsakal

पारगाव: जारकरवाडी ता.आंबेगाव येथील विहिरीत पडलेल्या तरसाला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत लोखंडी पाळणा सोडून तरसाला सुरक्षितरित्या बाहेर काढून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिल्याने त्याला जीवदान मिळाले आहे. येथील ढोबळेवाडीत राहणारे माजी उपसरपंच बाळासाहेब ढोबळे हे आज बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेतातील विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना पाण्यात आवाज आल्याने विहिरीत डोकावून पहिले असता विहिरीच्या पाण्यात तरस दिसला त्यांनी वनरक्षक एस.एन.अनासुने यांना मोबाईलवरून माहिती दिली. श्री. अनासुने ,वनमजुर दिलीप वाघ, अशोक जाधव, रामदास वळसे घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत लोखंडी पाळणा सोडून तरसाला सुरक्षितरित्या बाहेर काढून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले तरस सुमारे सहा ते सात वर्षाचा असून तो नर जातीचा होता असे श्री. अनासुने यांनी सांगितले.

जारकरवाडी ता. आंबेगाव : येथील विहिरीत पडलेल्या तरसाला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत लोखंडी पाळणा सोडून तरसाला सुरक्षितरित्या बाहेर काढून पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com