वारज्यातील वन उद्यानाला आग (व्हिडिओ)

वारजे - वनउद्यानात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली झाडे.
वारजे - वनउद्यानात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली झाडे.

वारजे - वारज्यातील गणपती माथा भागातील जवळपास ५० एकर असलेल्या स्मृतिवनाला गुरुवारी (ता.२२) दुपारी आग लागून या वन विभागातील जवळपास साडेचार एकर परिसर जळून खाक झाला. आगीमध्ये  जवळपास ७०० झाडे होरपळली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजता याच उद्यानात काम करणाऱ्या कामगारांच्या नजरचुकीने आग लागली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या उद्यानात गवत असल्याने ही आग तातडीने येथील साडेचार एकरावर पसरली. वारजे वन उद्यान ग्रुपचे बाळासाहेब कडू, राज बडदे, प्रफुल कंधारे, लोपेश मोरे, संदीप भवर, ओमकार बरकडे, संतोष मोदी, रोहन भुसारे, प्रथमेश सावंत यांनी आग आटोक्‍यात आणली. तोपर्यंत सिंहगड रस्त्यावरील सनसिटी भागातील अग्निशामक केंद्रातील जवान रोहिदास दुधाने, भारत भुजबळ, राकेश बरे, भारत पवार यांनी ही आग पूर्णपणे विझवली. मात्र या स्मृतिवनात सतत आग लागत असतात. याकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे लक्ष दिसून येत नसल्याचे चित्र आहे. आज लागलेल्या आगीत येथील जवळपास ७०० झाडे होरपळली आहेत.

आगीबाबत चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करण्यात येईल. आग लागणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल.
- दीपक पवार, वन अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com