इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांचे निधन

Former Chairman of the Panchayat Committee Ramesh Jadhav passed away
Former Chairman of the Panchayat Committee Ramesh Jadhav passed away

भिगवण : इंदापुर पंचायत समितीचे माजी सभापती रमेशराव जाधव (वय 66) यांचे सोमवारी (ता. 28) दुपारी एकच्या सुमारास अपघाती निधन झाले. रमेशराव जाधव यांचा अकरा दिवसांपtर्वी भिगवण बारामती रोडवर अपघात झाला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. अकरा दिवसांपासून पुण्यातील खासगी रुग्नालयांमध्ये त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर त्यांची मृ्त्यूशी झुंज अपयशी ठरली व त्यांची प्राणज्योत मालवली.

याबाबत अधिक माहिती अशी, रमेशराव जाधव यांचा 17 ऑक्टोबरला भिगवण बारामती रोडवर मदनवाडी घाटात बोलेरो गाडी व एस.टी. बस दरम्यान अपघात झाला होता. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. मागील अकरा दिवसांपासुन पुण्यातील खासगी रुग्नालयांमध्ये त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर सोमवारी त्यांची झुंज अपयशी ठरली व त्यांची प्राणज्योत मालवली. 

रमेशराव जाधव हे भिगवणचे दहा वर्षे सरपंच, इंदापुर पंचायत समितीचे अडीच वर्षे सभापती, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे पंधरा वर्षे संचालक, इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, श्रीनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व श्रीनाथ पतसंस्थेचे संस्थापक होते. येथील कला महाविदयालयाच्या उभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. माजी खासदार शंकरराव पाटील व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उजनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनामध्ये त्यांनी महत्वपुर्ण भुमिका निभावली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव व रोहन जाधव यांचे ते वडील तर माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला जाधव यांचे ते पती होत. 

इंदापुर तालुक्यातील राजकारण, सहकार, शिक्षण क्षेत्रातील जाणकार म्हणुन ते सर्व परिचित होते. त्याच्या रुपाने जाणकार नेता हरपल्याची भावना लोकांमधुन व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच भिगवण परिसरावर शोककळा पसरली. व्यापार पेठ बंद ठेवण्यात आली तर विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यांच्यावर भिगवण येथे मंगळवारी(ता. 29) सकाळी नऊ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com