esakal | ''खराडी कोव्हिड सेंटरच्या ऑक्सिजन पुरवठ्याचा सर्व खर्च आम्ही पेलणार''

बोलून बातमी शोधा

kharadi covid centar

''खराडी कोव्हिड सेंटरच्या ऑक्सिजन पुरवठ्याचा सर्व खर्च आम्ही पेलणार''

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामवाडी : पुणे महापालिकेकडून खराडी येथे नविन कोव्हिड सेंटर सुरू होणार असुन तिथे रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी माजी नगरसेविका उषा कळमकर व म.न.वि.से चे शहराध्यक्ष कल्पेश यांनी दर्शविली आहे. या संदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार व अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांना याबाबतचे लेखी पत्र देण्यात आले.

कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून रुग्णांना वेळेत ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने उपचार पुर्वी रुग्ण दगावत आहे. प्रशासन जितक्या देता येईल तितक्या सुविधांचा पुरवठा करत आहे. अधिक ताण प्रशासन वर पडत असल्याने सामाजिक कार्यकर्ते कल्पेश यादव आणि माजी नगरसेविका उषा कळमकर हे खराडी येथील केव्हिड सेंटर मधील ऑक्सिजन खर्चाचा बोझा उचलणार आहे .

हेही वाचा: समांतर महामार्ग, जंक्शन पॉइंटचा प्रश्न मार्गी लागणार

कळमकर व यादव यांनी सांगितले खराडी येथील कोविड सेंटरमध्ये, रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सध्या पुण्यात बेड आहे पण ऑक्सिजन नाही अशी अवस्था आहे. महापालिका प्रशासन पूर्ण प्रयत्न करीत आहे त्याच बरोबर मोठा आर्थिक बोजा देखील प्रशासनावर पडत आहे. हे लक्षात घेऊन समाजाने महापालिकेला शक्य ती मदत करावी असे वाटते. या भावनेतून खराडी येथील कोविड सेंटर साठी ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचा खर्च उचलण्याची तयारी आम्ही महापौरांकडे दाखवली आहे. यावेळी माजी नगरसेविका उषा कळमकर व कल्पेश यादव यांच्या वतीने निवेदन देण्यात आले

हेही वाचा: Success Story : निमोण्यातून ‘ड्रॅगन’ शेतीचा ‘अरुणोदय’