उरूळी काचंनच्या माजी उपसरपंचांना रस्त्याच्या वादातून जबर मारहाण

चार- पाच जणांनी लाकडी दांडके व दगडांनी जबर मारहाण केल्याची घटना घडली
हाणामारी
हाणामारीSakal

उरूळी कांचन - उरुळी कांचन येथील तुपे वस्ती येथे रस्त्याच्या कामाच्या वादातून चार- पाच जणांनी लाकडी दांडके व दगडांनी माजी उपसरपंचांना जबर मारहाण केल्याची घटना सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. भाऊसाहेब महादेव तुपे (रा. तुपे वस्ती, उरुळी कांचन) असे मारहाण झालेल्या उपसरपंचांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून उरुळी कांचन येथील तुपे वस्तीवरील ३०० मीटर रस्त्याचे काम रखडलेले असून या रस्त्यासाठी जागेचा वाद चालू होता. या रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने समाजकल्याण निधीतून ३ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या रस्त्याचे काम प्रत्यक्ष भाऊसाहेब तुपे हे तेथे हजेरी लावून पाहत असताना या ठिकाणी अचानक चार- पाच जणांनी तुपे यांना जाब विचारुन त्यांना लाकडी दांडके व दगडांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हल्लाखोर हल्ला करुन पसार झाले. डोक्यात दगडाचा मार लागल्याने भाऊसाहेब तुपे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com