Ajit Pawar
esakal
सिंचन घोटाळ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवार यांनी १९९९ च्या आधी युती सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पाची किंमत २०० कोटी होती, त्यात १०० कोटी युती सरकारने पक्षाच्या फंडासाठी मागितल्यानं किंमत ३१० कोटींवर पोहोचली असल्याचा दावा केलाय. यासंदर्भात अजित पवार यांनी एका अधिकाऱ्याचाही हवाला दिला आहे. आता तत्कालीन अभियंत्यानंही हे खरं असल्याचं म्हटलंय.