Tehsildar Shrikant Patil
sakal
इंदापूर - इंदापूरचे तत्कालीन तहसीलदार तथा सध्या विशेष भूसंपादन अधिकारी (माप-२), धाराशिव येथे कार्यरत असलेले श्रीकांत पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. पुणे जिल्ह्यातील एका जमीन प्रकरणात महसूल संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करून गंभीर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.