Bhimashankar Khed: भीमाशंकरच्या नामोल्लेखावरून खेड–आंबेगाव वाद; माजी आमदार दिलीप मोहितेंचा विरोध, शिखर बैठकीतील नाव बदलावर आक्षेप

Former MLA Dilip Mohite has opposed the mention and demanded correction: श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या नामोल्लेखात ‘खेड-आंबेगाव’चा उल्लेख; खेडच्या अस्मितेला धक्का बसण्याची भीती व्यक्त, अधिकृत कार्यवृत्तातून बदलाची मागणी
aming Dispute Over Bhimashankar Sparks Khed–Ambegaon Political Row

Naming Dispute Over Bhimashankar Sparks Khed–Ambegaon Political Row

esakal

Updated on

चाकण: श्री क्षेत्र भीमाशंकर संदर्भात खेड तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. शिखर बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर खेड- आंबेगाव असा उल्लेख करण्यात आला. या उल्लेखास मान्यता दिल्याची नोंद झाल्यास भविष्यात या विषयावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. भीमाशंकर हे खेड तालुक्यात आहे त्यामुळे भीमाशंकर खेड असाच उल्लेख करण्यात यावा. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देणार आहे असे आश्वासन दिले आहे असे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com