पुुण्याला रेड अलर्ट! आपत्कालीन यंत्रणांची तातडीने बैठक घ्या; वाचा, कोण म्हणाले?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्यातील सहकार नगर, कात्रज, पद्मावती या भागात अतिवृष्टी होऊन मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले होते. जिवितहानी झाली होती. या आठवणी अजूनही ताज्या आहेत. गेले दोन दिवस धुवाधार पाऊस पडत आहेच. त्यात हवामान खात्याने पावसासंदर्भातच रेड अलर्ट दिल्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पुणे : हवामान खात्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला असून पुण्याला रेड अलर्ट दिला आहे, हे लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे.

पुण्यासह सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रिय

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर आणि शहरात मुसळधार आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी पडतील. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महापालिका, महावितरण, पोलीस आणि आपत्कालीन कक्ष अशा सर्व विभागांच्या एकत्रितपणे बैठका घेऊन उपाययोजना कराव्यात त्यासाठी यंत्रणा कार्यरत करावी.

यंदा नवरात्र उत्सवात रास-दांडिया नाहीच; तरुण-तरुणींच्या आनंदावर फेरले पाणी​

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्यातील सहकार नगर, कात्रज, पद्मावती या भागात अतिवृष्टी होऊन मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले होते. जिवितहानी झाली होती. या आठवणी अजूनही ताज्या आहेत. गेले दोन दिवस धुवाधार पाऊस पडत आहेच. त्यात हवामान खात्याने पावसासंदर्भातच रेड अलर्ट दिल्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याकरिता प्रशासनाने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा असे मोहन जोशी यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Mohan Joshi said that call emergency meeting immediately As there is a red alert of rain in Pune